Ad will apear here
Next
‘गिफ्ट डीड’बाबत निवेदन
मुंबई : ‘भाजपचे सरकार आल्यावर रक्तातील नात्यांमध्ये गिफ्ट डीड करताना शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्य सरकारचे महसुलाचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. असे असतानाही सध्याही रक्तातील नात्यात गिफ्ट डीड करताना त्यावर स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा राज्य सरकारचा कुठलाही मानस नाही,’ असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. 

‘महानगरपालिकेबाहेरील ‘पेरिअर्बन’ भागात पाच टक्के, तर महानगरपालिका क्षेत्रांत चार टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती. कालच्या निर्णयातून त्यात समानता आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. ती पाच टक्के अशी समान ठेवण्यात आली आहे. तथापि, रक्तातील नात्यांत मालमत्ता देण्यासाठी अजूनही कोणतेही मुद्रांक शुल्क लागणार नाही,’ असेही भांडारी यांनी निवेदनात म्हटले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZIABC
Similar Posts
भाजपा चे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांच्या पत्रकार परिषदचे आयोजन! भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता मा. माधव भांडारी यांची पत्रकार परिषद शुक्रवार, दि. 10 फेब्रुवारी 2017 रोजी भाजपा मुंबई कार्यालय,  वसंतस्मृती, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व), मुंबई, येथे दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.  कृपया आपण आपला प्रतिनिधी व छायाचित्रकार पाठवावा, ही विनंती
अध्यक्ष ठरणार जिल्ह्यातच मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोअर समितीची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१६ मार्च) झाली. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीची चर्चा या बैठकीत झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या
‘मुख्यमंत्र्यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देणार’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देण्यात येणार असून, आगामी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी ३० जुलैला मुंबईत दिली
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचा विजय निश्चित - माधव भांडारी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी पंधरा जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले व मतदानाची आकडेवारी तसेच पक्षांतर्गत अहवाल ध्यानात घेता पंधरापैकी नऊ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल व भाजपाचे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडले जातील, असा विश्वास प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी व्यक्त केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language